जळगाव

महिला सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

महिला-सक्षमीकरण-मार्गदर्शन-कार्यक्रम

जळगाव,दि. ८ मार्च (प्रतिनिधी) रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श माता व विविध क्षेत्रात सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष रफत जहाँ सरफराज मॅडम व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते भगवान बुद्धांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण, धूप-दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष रफत जहाँ सरफराज मॅडम यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अनुपमा मॅडम, उषा सोनवणे, मंजुषा नवाडे मॅडम, डॉ. भाविका पाटील, पद्मा सुरवाडे, सौ. कल्पना भंगाळे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान महिलांच्या आरोग्य, शिक्षण व समाजातील सहभाग या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. आयुषी जांभुळे यांनी महिलांच्या कार्यावर आधारित कविता सादर केली. तसेच समुपदेशन शिबिराचे आयोजन करून महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रकाश सोनवणे सर, ज्ञानेश्वर वानखेडे, प्रितम सोनवणे, अभिषेक नाडके, आश्विनी मोलावे, ताई मडे, अनजली पडसाळे, न. साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button