जळगाव

।। आत्मोत्कर्ष वाणी ।।

'ज्ञानामुळे आत्मकल्याण होते !' - प. पू. डॉ. हेमप्रभाजी म. सा.

रत्नजळीत पिंजऱ्यात पक्षीला बांधले तरी त्याचे खरे स्वातंत्र हे आकाश उडण्यात आहे. त्याप्रमाणेच मनुष्याजवळ कितीही धन संपत्ती असेल तरी अंतिम क्षणावेळी त्याचे रक्षण त्याच्या हातून घडलेल्या कर्मामुळेच होते. जन्म-मृत्यूची भिती मनात ठेऊन मनुष्य सत्कर्म विसरतो, ही भिती मनात ठेऊ नये, फक्त चांगल्या कर्मांना प्राधान्य दिले पाहिजे. चांगले धर्माचारण करण्यासाठी संयम ही आपल्यातील शक्ती समजावी. संत, गुरू, आई-वडीलांकडून बोध घेतला पाहिजे. विनयशीलतेने आचरण केले पाहिजे.

क्रोध, काम, भोग हे दु:खाचे कारण बनतात. ही भौतीक साधने अशाश्वत असून त्याच्या मागे राहून जीवन बरबाद करु नये, निदान वृत्तीचे लोक संयम ठेऊ शकत नाही. संयम ठेऊन अहंभावाने कुणालाही पाणी सुद्धा पाजले तर त्यातून प्रतिबोध झाल्याशिवाय राहत नाही. कुठल्या जात, पंथ, कुळामध्ये जन्म घेतला म्हणून त्या कुळाचा उद्धार होत नाही, तर त्यासाठी चांगले आचारण, ज्ञानप्राप्ती आवश्यक असते. खऱ्या अर्थाने ते आत्मकल्याणाचा मार्ग असल्याचे चित्र संभूतीय अध्ययन, इषुकारीय अध्ययन, सभिक्षु अध्ययन या उत्तराध्ययनसूत्रच्या अनुक्रमे तेरा, चौदा व पंधराव्या अध्यायनाच्या वाचनावेळी प. पू. डॉ. हेमप्रभाजी म. सा. यांनी श्रावक-श्राविकांना सांगितले.

 

स्वाध्याय भवन, जळगाव
दि. १२ ऑक्टोबर २०२५
शब्दांकन : देवेंद्र पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button