Blogजळगाव

अनुभूती निवासी स्कूलला १९ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या निवड चाचणीच्या सामन्यांना सुरवात

जळगाव दि.२४ प्रतिनिधी : १९ वर्षाखालील महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघासाठी अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर निवड चाचणीची सुरवात झाली आहे. दि. २४ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान ही निवड चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये संपूर्ण राज्यातून २७ खेळाडू आपले कौशल्य अजमावीत आहेत. त्यांच्यासोबत वरिष्ठ गटातील १४ रणजीपटूसुद्धा खेळत आहे. पहिल्या निवड चाचणीच्या सामनाची सुरवात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कौन्सीलचे सदस्य व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या हस्ते नाणेफेक करुन करण्यात आली. “खेळांमध्ये हार जीत सुरुच असते, मात्र खेळाचा आदर ठेवला पाहिजे, यातून खेळ भावना विकसीत होते आणि चांगले व्यक्तिमत्व घडते” असा संवाद खेळांडूशी अतुल जैन यांनी साधला. सामन्याच्या सुरवातीला अतुल जैन यांच्यासमवेत अरविंद देशपांडे, सुयूश बुरकूल, रविंद्र धर्माधिकारी उपस्थित होते. पंच म्हणून मुश्ताक अली, घनश्याम चौधरी यांनी काम पाहिले. वरूण देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

१९ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या निवड चाचणीसाठीमध्ये सहभागी खेळांडूसमवेत अतुल जैन व निवड समितीचे सदस्य

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे अधिकृत असलेल्या निवड चाचणीचे आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे. यासाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन स्पोर्टस अकॅडमीचे सहकार्य लाभत आहे. १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघाच्या निवड चाचणी कमिटीचे अध्यक्ष अतुल गायकवाड- रत्नागिरी, सदस्य शैलेश भोसले-कोल्हापूर, मंगेश भुस्कटे-पुणे, शिरीष कामटे-पुणे, केतन दोशी-कराड यांच्या निरीक्षणातून संघ निवडला जाणार आहे. त्यांची उपस्थिती यात आहे. रणजी टीममधील १४ वरिष्ट खेळाडूंमध्ये महेश म्हस्के, सिध्दांत दोशी, उबेद खान, ऋषिकेश सोनवणे, रणजीत नीका थेम, अभिनव तिवारी, वैभव विभूटे, हर्षल हडके, यश खलाटकर, आयुष बिरादर, अक्षय वाईकर, तनय संघवी, बालकृष्ण कशिद, ऋषभ राठोड आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून निवड झालेल्या २७ खेळांडूमध्ये मोहीत कटारीया, प्रज्वल मोरे, मोहम्मद अक्रम, अनिश जोशी, शुभम कदम, सुहशिक जगताप, कार्तीक शेवाळे, श्रीवात्सा कुलकर्णी, यतीराज पोतोडे, आयुष रक्ताडे, समांथा धोरनार, साई परदेशी, राम राठोड, एकनाथ देवदे, इंद्रजीत शिंदे, सुश्रृत सावंत, राजवर्धन शितोडे, आर्यन देशमुख, अभिनंदन अदाक, जशन सिंग, व्यंकटेश बेहरे, ओमकार मोगर, रोनक अदानी, अभिशेक आमरे, रितविक रडे, इशान खोंडे, हर्षल मिश्रा यांचा समावेश आहे. निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा यशस्वीतेसाठी जैन स्पोर्टस अकडमीचे सर्व सहकारी सहकार्य करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button