टीम आवाज मराठी, जळगाव। १२ जुलै २०२३ । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून धुळ्याकडून एरंडोल कडे येणारी बस व पुढे चालणारी प्याजो रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात प्याजो मधील चार प्रवासी जखमी झाले ही दुर्घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एरंडोल पासून पारोळ्याकडे तीन किलोमीटर अंतरावर हॉटेल फाउंटन पासून थोड्या अंतरावर मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली विशेष म्हणजे एकाच परिवारातील तीन वर्षाच्या बालकासह आई वडील जखमी झाले .
जखमींची नावे पुढीलप्रमाणे
फारुख रमजान खाटीक रा. फकीर वाडा, एरंडोल वय २६ वर्ष, मुस्कान फारुख खाटीक वय २२ वर्ष,
फयीजाआन फारुख खाटीक वय ३ वर्ष, गणेश शांताराम महाजन रा. पारोळा वय ४५ वर्ष.,
एम एच २० बी एल ३४५१ क्रमांकाची धुळे जळगाव बस एरंडोल कडे येत होती तर पुढे एम एच १९ ए एक्स ,०२९१ प्याजो रिक्षा ही पुढे चालत होती.
राष्ट्रीय महामार्गावर या अपघातामुळे थोडा वेळ वाहतूक विस्कळीत झाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल अखिल मुजावर, किरण पाटील, हे अपघात स्थळी तात्काळ झाले अपघातातील गाडी बाजूला करण्यात आली व वाहतूक सुरळीत झाले यावेळी. माजी उपनगराध्यक्ष अभिजीत पाटील, शैलेश चौधरी पत्रकार यांनी सुद्धा मदत कार्य केले.