जळगावात तृतीयपंथीने केले तरुणाशी लग्न करून फसवणूक
तृतीयपंथीयाने तरुणाशी चक्क लग्न करून त्याची फसवणूक
टीम आवाज मराठी, जळगाव | ०६ जुलै २०२३ | देशात अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या आश्चर्यचकित घडणाऱ्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. अशीच एक घटना जळगाव शहरामध्ये महिला असल्याचे भासवून एका तृतीयपंथीयाने तरुणाशी चक्क लग्न करून त्याची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, न्यायालयाने तृतीयपंथीयाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले आहेत. जळगाव शहरामध्ये एका २६ वर्षीय तरुणाची सोशल माध्यमाद्वारे एका तरुणीशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये `संदेशाची देवाणघेवाण वाढून प्रत्यक्ष भेटी झाल्या. आणि मग एकमेकांना ते भेटू लागले. नंतर त्या भेटीचे रूपांतर त्यांचे दोघांचे ऐकमेकांवर प्रेमात रूपांतर झाले. नंतर दि. २९ एप्रिल २०२३ रोजी त्यांनी विवाह केला. काही दिवसांमध्ये तरुणीच्या हालचाली मध्ये संशयास्पद वाटल्याने आणि ती स्पर्श करू देत नसल्याने तरुणाचा संशय निर्माण झाला. लग्नाच्या काही दिवसांनी तरुणीला डॉक्टराकडे तपासणीस नेले असता ती तृतीयपंथी असल्याचे निदर्शनास आले.या विषयाची परिसरात चर्चा अधिक रंगू लागली आहे.