
जळगाव माझी महापौर जयश्रीताई महाजन यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान जळगाव शहर मतदार संघातून भाजपचे विद्यमान् आ. राजूमामा भोळे यांचा सामना शिवसेनेच्या माजी महापौर जयश्री महाजन यांच्याशी होणार आहे. मात्र शहरातून काही इच्छूक उमेदवार अपक्ष रिंगणात उतरणार असल्याची चर्चा असून २९ ऑक्टोबर पर्यंत कोणकोण उमेदवारी दाखल करतात तर ४ नोव्हेंबर माघारी पर्यंत कोण रिंगणातून पळ काढतो हे पहाणे उत्सुकतेचे राहणार आहे.