केमिकल कंपनीच्या आवारातून दुचाकीची चोरी: एमआयडीसीत गुन्हा दाखल
दुचाकीची चोरी: एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
टीम आवाज मराठी, जळगाव | ०४ जुलै २०२३ | येथील जळगाव शहरातील एमआयडीसी मधील एका केमीकल कंपनीच्या परिसरातून एका दुचाकीची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटनेची एमआयडीसी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पंकज अर्जून सोनवणे (वय-२३) रा. दिनगर नगर, आसोदा रोड, जळगाव ता.जि.जळगाव हा तरूण येथील रहिवासी असून तो एमआयडीसी परिसरातील केमीकल कंपनी मध्ये कामाला आहे. तो दि. १ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तेथे ड्युटीवर कार्यरत असताना त्याठिकाणी त्याने त्यांची दुचाकी (एमएच १९ डीसी ९६४२) हा पार्किंग केलेली होती. त्यावेळी एका अज्ञात चोरट्यांने पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेण्याचा असा प्रकार घडल्यानंतर तरूणाने परिसरात दुचाकी ज्या ठिकाणी पार्किंग केली होती त्या ठिकाणी आढळून आली नाही नंतर त्याने इतरत्र सर्व ठिकाणी शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळाली नाही. शेवटी अखेर एमआयडीसी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे करीत आहे.