धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२चे भूमिपूजन ५ हजार २१७ कोटींच्या विकासकामांना मंजुरी–
गोंदिया :-धापेवाड़ा उपसा सिंचन प्रकल्पामुळे ७५ हजार एकर जमीन ओलिताखाली येणार असून, याचा फायदा गोंदिया जिल्ह्यातील शेतकन्यांना होणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर तिरोडा-गोरेगाव क्षेत्रातील शेती सुजलाम, सुफलाम होईल व सामान्य शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील धापेवाडा उपसा सिंचन योजना प्रकल्प टप्पा-२ व तिरोडा
नगर परिषद व गोरेगाव नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामांचे भूमिपूजन व जलपूजन रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहीद मिश्रा विद्यालय (तिरोडा) येथील पटांगणावर आयोजित करण्यात
आले होते, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विधान परिषद आमदार डॉ. परिणय फुके, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी प्रजित
गोरख भामरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगनंवम तसचे विविध पदधिकारी व अधिकारी उपस्थित होते. धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ हा प्रकल्प तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा गावाजवळ वैनगंगा नदीवर असून, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाय, सडक अर्जुनी मोरगाव अर्जुनी वा तालुक्यांतील २१४ गावांतील एकूण ८० हजार ७२६ हेक्टर मिळणार आहे