निमजाई फाउंडेशन मध्ये जागतिक युवा कौशल्य विकास दिवस साजरा
संस्था अध्यक्ष शीतल बाक्षे यांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाचे पटवून दिले महत्त्व

टीम आवाज मराठी जळगाव | १५ जुलै २०२३ | निमजाई फाउंडेशन प्रशिक्षण केंद्राच्या वतीने १५ जुलै जागतिक युवा कौशल्य विकास दिवसाच्या अनुषंगाने जळगावच्या प्रशिक्षण केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्था अध्यक्ष शीतल पाटील (बाक्षे) यांनी प्रास्ताविकाद्वारे जिल्ह्यातील वाव असलेल्या क्षेत्रांबद्दल माहिती देऊन कौशल्य विकास प्रशिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. विद्यार्थ्यांना तसेच सर्वसामान्य व्यक्तीला जीवन आणि शिक्षण यांची सांगड घालतांना जीवन कौशल्यांचा उपयोग होत असून त्यामध्ये आणखी मोठ्याप्रमाणात विकास होणे अपेक्षित आहे यशस्वी जीवन जगण्यासाठी विचारपूर्वक शिक्षणाची प्रशिक्षणाची व कौशल्य विकासाची अत्यंत गरज आहे. तसेच जीवन कौशल्यामुळे जीवन जास्तीत जास्त कार्यक्षम व यशस्वीपणे जगता येते या तरूण मनुष्यबळाला कौशल्य विकासाची जोड देऊन नवीन भरारी घेण्याची क्षमता हि सर्व महिलांमध्ये आहे त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन संस्था अध्यक्ष यांनी केले.
जागतिक युवा कौशल्य दिवस तांत्रिक, व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व आणि स्थानिक आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित व इतर कौशल्यांच्या विकासाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने १५ जुलै रोजी साजरा केला जातो. तरुणांना रोजगार योग्य काम आणि उद्योजकता या कौशल्यांनी सुसज्ज करणे गरजेचे आहे हा दिवस वर्तमान आणि भविष्यातील जागतिक आव्हाने सोडवण्यासाठी कुशल तरुणांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर देखील प्रकाश टाकतो. तसेच कौशल्यप्राप्ती म्हणजे फक्त रोजगाराचे साधन नसून दैनंदिन जीवनात उत्साही आणि आनंदी राहण्याचेही ते एक साधन आहे, असे अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात म्हटले..
निमजाई फाउंडेशनच्या विद्यार्थिनींना दाखवले फॅशन-शो चे चित्रीकरण
१५ जुलै जागतिक युवा कौशल्य विकास दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व महिलांना व विद्यार्थिनींना निमजाई फाउंडेशन ने २०१९ मध्ये घेतलेल्या फॅशन-शो चे चित्रीकरण दाखवण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने प्रशिक्ष्णार्थिनी हाताने तयार केलेल्या ड्रेसेस चे आकर्षण ठरले. यामध्ये वैष्णवी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका रंजना पाटील यांची कार्यक्रमाला खास उपस्थिती होती. निमजाई फाउंडेशनच्या विद्यार्थिनीं हाताने तयार केलेल्या ड्रेसेस साठी लागणारी मेहनत चे सखोल स्पष्टीकरण रंजना पाटील यांनी दिले.
निमजाई फाउंडेशनच्या विद्यार्थिनीं केले मनोगत व्यक्त
राज्यशासन आणि निमजाई फाउंडेशनच्या वतीने कौशल्य विकासाच्या माध्यमातून आम्हाला उंच भरारी घेण्यासाठी एक नवीन प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आम्ही या नामी संधीचे साक्षीदार आहोत याचे आम्हाला मोठे कौतुक वाटते, त्याचप्रमाणे कौशल्य आत्मसात करण्यासाठी सर्वांच्या मनाची तयारी असणे महत्वाचे ठरते, असे विद्यार्थिनीं आपल्या मनोगतात व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिव भूषण बाक्षे शिक्षिका अर्चना पाटील, कविता पाटील, विवेक जावळे, हेमंत ढाके, हितेश पाटील यांनी परिश्रम घेतले.