टीम आवाज मराठी,जळगाव दि.10 ऑक्टोबर 2024 ;– हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणावर एमआयडीसी पोलीसांनी मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शैबाज शेख बाबु शेख वय २० रा.मास्टर कॉलनी, जळगाव असे संशयित आरोपीचे नाव आहे.
जळगाव शहरातील शेरा चौकातील बॉम्बे बिर्यानी दुकानासमोर संशयित आरोपी शैबाज शेख बाबू शेख हा बेकायदेशीरपणे हातात तलवार घेवून दहशत माजवित असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता संशयित आरोपी शैबाज शेख बाबू शेख याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.