टीम आवाज मराठी,जळगाव दि. 9 ऑक्टोबर 2024 -तालुक्यातील ममुराबाद येथे एका भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली . याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश दिलीप पाटील (वय ३२, रा.आडगाव,ता.यावल) असे मृत तरुणाचे नाव आहे. राजेश पाटील हा जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयातील पॅथोलॉजी लॅबमध्ये कामाला होता. रात्री काम संपवून तो दुचाकीने घरी आडगावलायेथे जात असतांना ममुराबाद गावाच्या पुढे यावलकडून जळगावकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने राजेश पाटील याच्या दुचाकीला धडक दिल्यानेत्याचा जागीच मृत्यू झाला. ममुराबाद येथील काही तरुणांनी रस्त्याला पडलेल्या राजेशचा मृतदेह पाहून तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
मृतदेहाची ओळख पटल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी कलेची होती. याबाबत जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.राजेशच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, ८ वर्षाचा मुलगा, ५ महिन्यांची मुलगी, भाऊ असा परिवार आहे.