क्राईमजळगाव

Manudevi Accident News: देवदर्शनासाठी जाताना भीषण अपघात!

कारची बसला धडक; तीन जण ठार, एक गंभीर

टीम आवाज मराठी,चोपडा/जळगाव दि. 08 ऑक्टोबर 2024 :-  यावल तालुक्यातील मनुदेवी या तिर्थक्षेत्राला दर्शनासाठी जात असतांना कार आणि शिवशाही बसमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चोपडा तालुक्यातील चोपडा-धरणगाव रस्त्यावर हा अपघात घडला. या अपघातात कारचालक गंभीर जखमी असून त्यांच्यावर चोपडा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.

मलाबार गोल्ड… आजचा रंग लाल

याबाबत सविस्तर वृत्त असे की, निजामपूर येथील प्रतिष्ठीत व्यापारी श्रीधर बंडू राणे हे दोघं मुलांसह इतर दोन सहका-यांसोबत कारने मनुदेवीच्या दर्शनासाठी जात होते. मनुदेवी मातेला त्यांच्या मार्फत आज महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यामुळे या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. 

त्यांच्या कारचे टायर फुटल्याने कार नियंत्रित होऊन ती चोपड्याहून नाशिकला जाणाऱ्या शिवशाही बसला धडकली. या अपघात निलेश श्रीधर राणे, शैलेश श्रीधर राणे, जितेंद्र मुरलीधर भोकरे (४८) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालक गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर चोपडा शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहे या घटनेनं राणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button