क्राईमजळगाव

दुचाकी चोरी प्रकरणी कुसुंबा येथील दोघांना अटक

तीन दुचाकी हस्तगत: एमआयडीसी पोलिसांची कारवाई

टीम आवाज मराठी, जळगाव दि. 05 ऑक्टोबर 2024 तालुक्यातील उमाळा येथून चोरीला गेलेल्या दुचाकी चोरीच्या तपास प्रकरणी कुसुंबातील दोन संशयीतना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथील रहिवाशी भूषण झांबरे १९ सप्टेंबर रोजी कामाच्या निमित्ताने (एमएच १९ बीएल ९३३४) या दुचाकीवरून जळगावकडे येत असताना रस्त्यावरील उमाळा बसस्थानकाजवळ नास्ता करण्यासाठी थांबले असता त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा उघडकीस आल्याने झांबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान कुसुंबा शिवारातील  संशयतांनी दुचाकी चोरून नेल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना  मिळाली. या दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले.

मलाबार गोल्ड अँड डायमंड्स… आजचा रंग राखाडी…

या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, नितीन ठाकूर, नाना तायडे, किरण पाटील, गणेश ठाकरे, ललित नारखेडे यांनी कारवाई करत संशयित आरोपी पवन उर्फ भांजे गणेश पाटील वय-२२ आणि निखिल जयराम पाटील वय-२१ दोन्ही रा. इंदिरानगर, कुसुंबा या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या एकूण तीन दुचाकी हस्तगत करण्यात आले. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button