जळगाव

भारताच्या बुद्धिबळाच्या इतिहासात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल – अशोक जैन

ऑलिम्पियाडमधील ऐतिहासिक विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन!

आवाज मराठी जळगाव दि.24-9-24- बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आपल्या संघाने साधलेला अपूर्व यश हा भारताच्या बुद्धिबळ इतिहासात एक सुवर्णक्षण ठरला आहे. आपल्या खेळाडूंनी दाखवलेली परिपूर्ण खेळतंत्र, मानसिक सबलता, आणि जिद्द यामुळे भारताचे नाव जागतिक पातळीवर पुन्हा एकदा उज्वल झाले आहे.

अथक परिश्रम आणि ध्येयाशी असलेल्या निष्ठेमुळेच आपण आज हे यश प्राप्त केले आहे.
या विजयामागे केवळ खेळाडूंचा नाही, तर प्रशिक्षक, व्यवस्थापक, संघाचे पदाधिकारी, आणि खेळाच्या प्रत्येक टप्प्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. संघाच्या या संघटित प्रयत्नांमुळेच आपल्याला हा सन्मान मिळाला आहे.

भारतीय बुद्धिबळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल
हा विजय केवळ एका स्पर्धेचा नाही, तर भारतीय बुद्धिबळाच्या उज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. या यशाने नव्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, आणि देशभरात बुद्धिबळ खेळाच्या लोकप्रियतेत नक्कीच वाढ होईल. या विजयामुळे भारत बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय मंचावर एक अग्रगण्य शक्ती बनत आहे, आणि हे यश आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

चेस ऑलिंपियाड मधील सर्व सहभागी प्रतिभाशाली खेळाडू अर्जुन एरीगैसी, डी गुकेश,आर प्रगनानन्धा, विदित गुजराथी, हरीकृष्ण पेंटाला व महिला गटातील खेळाडू हरीका द्रोणावल्ली, आर वैशाली, तानिया सचदेव, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल यांनी जागतिक स्तरावर यश प्राप्त केले यामुळे भारतीय शतरंजचे भविष्य उज्ज्वल आहे.या सर्व विजेत्या खेळाडूंचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन. चेस ऑलिम्पियाडचे कप्तान म्हणून ग्रैंड मास्टर अभिजीत कुंटे आपले नेतृत्व अद्वितीय आहे. आपल्या मार्गदर्शनात भारतीय टीमने अनेक महत्त्वाच्या यशांचे शिखर गाठले आहे. आपली रणनीती, समर्पण आणि प्रेरणा खेळाडूना नवीन उंची गाठण्यासाठी प्रेरित करते. आपल्या कामगिरीसाठी आपल्याला मनःपूर्वक अभिनंदन!
विशेष म्हणजे चेस ऑलिम्पियाड विजेता विदित गुजराथी ला शतरंज प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात सहकार्य करण्याची संधी जैन इरिगेशन ला मिळाली, याचा आम्हाला अभिमान आहे. आज त्याच्या यशस्वी घोडदौडीला पाहून हृदयभरून येतं, आणि त्याच्या प्रगतीने आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो. त्याची मेहनत, समर्पण आणि यश खरोखरच प्रेरणादायी आहे.”

आमच्या सर्व खेळाडूंना, प्रशिक्षकांना, आणि संपूर्ण संघाला हार्दिक शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांचे हे फलित असून, भारताच्या बुद्धिबळाच्या इतिहासात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.

आपल्या संघाच्या उज्ज्वल वाटचालीसाठी अशाच उंच भरारीची आणि यशस्वी भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

अशोक जैन
सल्लागार समिती सदस्य,
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (AICF)

.भारत आता जागतिक स्तरावर बुद्धिबळातील एक प्रमुख शक्ती – अतुल जैन

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताचा नेत्रदीपक विजय हा देशासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे. दोन्ही संघांनी – पुरुष आणि महिला – अत्यंत चांगली कामगिरी केली. भारतीय बुद्धिबळपटूंनी आपली प्रतिभा तर सिद्ध केलीच, पण मानसिक कणखरपणा आणि सांघिक कार्यातून हे सिद्ध केले की भारत आता जागतिक स्तरावर बुद्धिबळातील एक प्रमुख शक्ती बनला आहे.

पुरुष संघाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी सातत्याने प्रत्येक सामना अचूक रणनीती आणि एकाग्रतेने हाताळला. त्याच्या अनेक खेळांमधील निर्णायक चाली पाहून संपूर्ण जगाने त्याच्या कौशल्याचे कौतुक केले. महिला संघानेही दमदार खेळाचे प्रदर्शन केले आणि कठीण परिस्थितीतही धीर सोडला नाही. त्याच्या खेळात संयम आणि जिद्द दिसून आली.

या दोन भारतीय संघांच्या विजयावरून देशातील बुद्धिबळाची पातळी सातत्याने वाढत असून, भारतीय खेळाडूंमध्ये विश्वविजेते बनण्याची क्षमता असल्याचे दिसून येते. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील ही कामगिरी येणाऱ्या पिढीलाही प्रेरणादायी ठरेल.
भारतीय खेळाडू जागतिक शतरंज ऑलिंपियाड, ग्रँडमास्टर स्पर्धा, आणि इतर प्रमुख स्पर्धांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. आजपर्यंत कधी नव्हे एवढ्या अधिक संख्येने युवा खेळाडूंनी यश संपादित केले आहे. विशेष म्हणजे पुरुष(ओपन) व महिला या दोन्ही गटांत भारताने एकाच वेळी पहिल्यांदाच विजयी सुवर्ण पदक प्राप्त करुन भारताचे वाश्विक स्तरावर वर्चस्व प्राप्त केले आहे. आणि या दृष्टीने त्यांना “गोल्डन जनरेशन”म्हणता येईल

चेस किंवा शतरंज हा मूळ भारतीय खेळ आहे, आणि त्याची उत्पत्ती भारतात प्राचीन काळात झाली. शतरंजचे मूळ रूप संस्कृतमध्ये “चतुरंग” म्हणून ओळखले जात असे

सध्याची भारतीय युवा खेळाडूंची पिढी अत्यंत प्रतिभाशाली आहे.अर्जुन एरिगैसी,डी गुकेश, प्रज्ञाननंदा, विदित गुजराथी, दिव्या देशमुख, टी.आर. वैशाली सारखे खेळाडू जागतिक स्तरावर यशस्वी होत आहेत, ज्यामुळे भारतीय शतरंजचे भविष्य उज्ज्वल आहे.

सर्व विजयी खेळाडू,कर्णधार, प्रशिक्षकांचे, AICF चे पदाधिकारी या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन।

अतुल जैन
अध्यक्ष,
जळगाव जिल्हा चेस एसोसिएशनॉ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button