जळगाव म. न. पा. आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ उत्साहात
जळगाव शहर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित
आवाज मराठी जळगाव दि.23-9-24- जळगाव शहर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि अनुभूती स्कूल द्वारे सहआयोजित जळगाव म. न. पा. आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ मधील १४, १७ आणि १९ वर्षाआतील गटामधील मुलं व मुलींची बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्यात. अनुभूती निवासी स्कूल येथील बॅडमिंटन हॉल येथे १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा झाली.
या स्पर्धेत शहरातील शाळांमधील १४, १७, १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींच्या २० संघांचा समावेश होता. या स्पर्धेत ५० संघांचे २५० खेळाडूंचा सहभाग नोंदविला. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय संघांना जैन इरिगेशन सिस्टीम लि. तर्फे क्रमश: गोल्ड, सिल्वर आणि कास्य पदक पारितोषिक म्हणून देण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडासमन्वयक रवींद्र धर्माधिकारी, अनुभूती निवासी स्कूल शाळेचे व्यवस्थापक विक्रांत जाधव, भिकन खंबायत, जैन स्पोर्ट्स अॅकडमी फुटबॉलचे प्रशिक्षक श्री मोहसीन व मुख्य पंच दीपिका ठाकूर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मान्यवर अतिथींचा स्वागत किशोर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय संघांना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड द्वारे प्रायोजित गोल्ड, सिल्वर आणि कास्य पदक देण्यात आले. या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केले.
स्पर्धेचा निकाल
१४ वर्षा आतील मुलांचे संघ गटात प्रथम क्रमांक – सेंट जोसेफ कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल द्वितीय क्रमांक – पोदार इंटरनेशनल स्कूल, तृतीय क्रमांक – सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल
१४ वर्षा आतील मुलींचे संघ गटात प्रथम क्रमांक – महाराणा प्रताप हायस्कूल, द्वितीय क्रमांक – सेंट जोसेफ कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक – सेंट लॉरेन्स कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल
१७ वर्षा आतील मुलांचे संघ गटात प्रथम क्रमांक – ओरियन स्कूल (स्टेट बोर्ड), द्वितीय क्रमांक – एम. जे. कॉलेज, तृतीय क्रमांक – सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल
१७ वर्षा आतील मुलींचे संघ गटात प्रथम क्रमांक – सेंट जोसेफ कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, द्वितीय क्रमांक – सेंट लॉरेन्स कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक – सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल
१९ वर्षा आतील मुलांचे संघ गटात प्रथम क्रमांक – धनाजी नाना चौधरी महाविद्यालय, द्वितीय क्रमांक – एम. जे. कॉलेज, तृतीय क्रमांक – बबन बाहेती महाविद्यालय
१९ वर्षा आतील मुलींचे संघ गटात प्रथम क्रमांक – एम. जे. कॉलेज, द्वितीय क्रमांक – सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक – नूतन मराठा महाविद्यालय
या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून दीपिका ठाकूर व पंच म्हणून नमन जैन, ईशांत साळी, रजत पटेल, फाल्गुन पाटील, शांतनू फालक, संस्कार, अंकित कोळी, देवेंद्र कोळी, अनामय जोशी, फाल्गुनी पवार, तेजश्री शुक्ल, हमजा खान, मिहिर कुलकर्णी, रीत नाथांनी, शुभम चांदसरकर, करण पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक किशोरसिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनात विकास बारी, शुभम पाटील, पूनम ठाकूर, राखी ठाकूर, जाझीब शेख, मशरुख शेख यांनी परिश्रम घेतले. सहप्रशिक्षक दिपिका ठाकुर यांनी आभार मानले.