“३री जैन चॅलेंज ट्रॉफी २०२४”
जळगाव जिल्हा आंतरशालेय बॅडमिंटन अजिंक्यपद मधील ११ वर्षाआतील गटातील मुलं व मुलींची स्पर्धा उत्साहात संपन्न झाले
आवाज मराठी जळगाव दि.10-9-24- जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत आणि जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड द्वारे प्रायोजित तसेच अनुभूती स्कूल द्वारे सहप्रायोजित व जैन स्पोर्ट्स अकॅडमी द्वारे आयोजित “३री जैन चॅलेंज ट्रॉफी २०२४” मधील ११ वर्षाआतील गटामधील मुलं व मुलींची बॅडमिंटन स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धा दिनांक ९ ते १० सप्टेंबर २०२४ दरम्यान अनुभूती स्कूल निवासी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १४,१७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली सांघिक व एकेरी या सर्व गटांचा समावेश होता.
या स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्यातील एकूण २० शाळेचे संघाचे १०० खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन जैन स्पोर्ट्स अकॅडेमी चे क्रीडासमन्वयक श्री रवींद्र धर्माधिकारी, अनुभूती स्कूल (निवासी) शाळेचे क्रीडाशिक्षक श्री शशिकांत तिवारी, बॅडमिंटन प्रशिक्षक श्री अतुल देशपांडे, कांताई सभागृहाचे व्यवस्थापक श्री शालिग्राम राणे व मुख्य पंच श्रीमती दीपिका ठाकूर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मान्यवर अतिथींचा स्वागत किशोर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते विजयी व उपविजयी संघांचा व खेळाडूंना ३री जैन चॅलेंज ट्रॉफी २०२४ अजिंक्यपद चे चषक व प्रमाणपत्र देण्यात आले.
या स्पर्धेचे विजयी व उपविजयी संघ व खेळाडू पुढीलप्रमाणे आहे
११ वर्षा आतील मुलांचे संघ
विजयी – सेंट जोसेफ कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव
उपविजयी – रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, मोहाडी
११ वर्षा आतील मुलींचे संघ
विजयी – किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, सावखेडा
उपविजयी – जी एच रायसोनी पब्लिक स्कूल, सावखेडा
या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून दीपिका ठाकूर व पंच म्हणून मुकुंदा चौधरी, स्मित चोरडिया, आर्य, स्वयंम जगदाळे, पूनम ठाकूर, हमजा खान, यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शना अंतर्गत विकास बारी, शुभम पाटील, पुनम ठाकूर, फाल्गुनी पवार, कोनीका पाटील यांनी मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैन स्पोर्टस अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया व आभार प्रदर्शन सहप्रशिक्षक दिपिका ठाकुर यांनी केले.
या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन यांनी केले व पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.