जळगाव

आंतर शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पाचोरा चे शाश्वत व श्रावणी प्रथम

जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय

विभागीय पातळीवर निवड झालेल्या दहा खेळाडूंसोबत खुर्चीवर बसलेले डावीकडून श्री संजय पाटील, रवींद्र धर्माधिकारी, राजेंद्र आल्हाद, अरविंद देशपांडे, फारुक शेख,मीनल थोरात, नथू सोमवंशी व प्रवीण ठाकरे आधी दिसत आहे.

आवाज मराठी जळगाव दि,5-9-24- आंतर शालेय जिल्हास्तरीय १४ वर्षे आतील बुद्धिबळ स्पर्धेत मुलींमध्ये पाचोर्‍याची श्रावणी संतोष अलाहित गुरुकुल इंग्लिश स्कूल प्रथम मुलांमध्ये पाचोर्‍याच शाश्वत राहुल संघवी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कांताई सभागृह येथे झालेल्या आंतर शालेय जिल्हास्तरीय चौदा वर्षातील बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात झाली व संध्याकाळी सात फेऱ्यानंतर नंतर स्पर्धेचा समारोप झाला.
या स्पर्धेत प्रथम पाच क्रमांक स्पर्धेत प्रथम ५ आलेल्या मुलं आणि मुलींना जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे पदक देण्यात आली तसेच या प्रथम पाच व मुलं आणि मुलींची निवड विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी करण्यात आली
विजय खेळाडूंना पारितोषिक देण्यासाठी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे प्रवीण ठाकरे रवींद्र धर्माधिकारी, संजय पाटील, क्रीडा अधिकारी कार्यालयाचे मीनल थोरात व राजेंद्र आल्हाद यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली
स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून प्रवीण ठाकरे तर सहकार्य करणारे संजय पाटील, नथू सोमवंशी, आदींनी काम बघितले
१४ वर्ष वयोगट बुद्धिबळ अंतिम निकाल प्रथम पाच मुली
श्रावणी संतोष अलाहेत गुरुकुल इंग्लिश स्कूल पाचोरा
अवंती अमित महाजन पोद्दार इंटरनॅशनल स्कूल चाळीसगाव ऋतुजा राहुल बालपांडे गो से हायस्कूल पाचोरा पाचोरा
मुदीता महेश लाड चावरा इंटरनॅशनल स्कूल चोपडा
ग्रंथी किशोर पटेल पीबीए इंग्लिश स्कूल अमळनेर

१४ वर्ष वयोगट बुद्धिबळ अंतिम निकाल प्रथम पाच मुले
शाश्वत राहुल संघवी निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा
तिलक सुरज सरोदे, पोदार इंटरनॅशनल स्कूल अकलूज ता यावल
संग्राम चक्रधर रितापुरे द वर्ल्ड स्कूल भुसावल
तन्मय प्रकाश पाटील डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे विद्यालय चाळीसगाव
हिमांशू जगदीश नेहेते पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अकलूज तालुका यावल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button