जळगाव

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड व अजिंक्यपद स्पर्धेत शुभम पाटील ला तिहेरी मुकुट

तवस्मी मोहता, पूर्वा पाटील आणि किशोर सिंह यांना दुहेरी मुकुट

आवाज मराठी जळगाव दि.२ – जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन आयोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड व अजिंक्यपद स्पर्धा-२०२४ या स्पर्धा दि. २९ ते ३० जुन दरम्यान झाल्यात. जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा तालुक्यांमधून १८३ खेळाडूंचा सहभाग घेतला.

स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, जैन स्पोर्ट्स अकॅडेमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, शिल्पा फर्निचरचे किर्ती मुनोत, आर्य मल्टीपर्पज फाउंडेशनचे डॉ. तुषार उपाध्ये व मुख्य पंच चेतना शाह उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत किशोर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन झाले. जिल्हातील बॅडमिंटन प्रशिक्षकांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विजयी व उपविजयी खेळाडूंना जळगाव जिल्हा अजिंक्यपदचे चषक, क्रीडा साहित्य व प्रमाणपत्र प्रदान केले गेले.

या स्पर्धेचे विजयी व उपविजयी खेळाडू पुढीलप्रमाणे आहे

११ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – मुकुंदा मनीष चौधरी

उपविजयी – नमित प्रशांत मगर

११ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – तवस्मी वरून मोहता

उपविजयी – रुषा राहुल झोपे

१३ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – अन्मय अमोल जोशी

उपविजयी – मयंक आनंद गाडेकर

१३ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – तवस्मी वरून मोहता

उपविजयी – यशश्री राजकुमार मुनोत

१५ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – देवदत्त नितीन अहिरे

उपविजयी – अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे

१५ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – तनिषा अनिल साळुंखे

उपविजयी – ओवी अमोल पाटील

१५ वर्षा आतील मुले दुहेरी

विजयी – स्वामी उन्मेश पाटील आणि अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे

उपविजयी – रोहित किशोर सोनवणे आणि शांतनु शैलेश फालक

१५ वर्षा आतील मुली दुहेरी

विजयी – कुहू मयूर शर्मा आणि वैष्णवी शैलेंद्र पाटील

उपविजयी – सयुरी अमित राजपूत आणि स्वरा योगेंद्र नेहेते

१७ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – हेमराज अशोक लवांगे

उपविजयी – दक्ष धनंजय चव्हाण

१७ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – पूर्वा किशोर पाटील

उपविजयी – ओवी अमोल पाटील

१७ वर्षा आतील मुले दुहेरी

विजयी – आर्य महेश गोला आणि हमझा साजिद खान

उपविजयी – ह्रिदय विशाल पिपारीया आणि मिहीर राजेश कुलकर्णी

१९ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – तेजम केशव

उपविजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर

१९ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – पूर्वा किशोर पाटील

उपविजयी – स्वरा निलेश पाटील

पुरुष एकेरी

विजयी – शुभम मुरलीधर पाटील

उपविजयी – तेजम केशव

महिला एकेरी

विजयी – राजश्री संदीप पाटील

उपविजयी – स्वरा निलेश पाटील

पुरुष दुहेरी

विजयी – डॉ. तुषार गणेश उपाध्ये आणि शुभम मुरलीधर पाटील

उपविजयी – शेखर सतीश सोनवणे आणि मंदार मुकुंद कासार

३५ वर्षावरील पुरुष एकेरी

विजयी – सचिन विष्णू बस्ते

उपविजयी – डॉ. तुषार गणेश उपाध्ये

३५ वर्षावरील पुरुष दुहेरी

विजयी – डॉ. अमित चौधरी आणि किशोर सिंग सिसोदिया

उपविजयी – डॉ. अमित राजपुत आणि समीर सुनील रोकडे

३५ वर्षावरील मिश्र दुहेरी

विजयी – डॉ. सारंगा मनोज लोखंडे आणि किशोर सिंह सिसोदिया

उपविजयी – डॉ. वृषाली विवेक पाटील आणि डॉ. तुषार गणेश उपाध्ये

या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून श्रीमती चेतना शाह व पंच म्हणून अर्श शेख, देवेंद्र कोळी, मशरूक शेख, तेजम केशव, शुभम जितेंद्र चांदसरकर, देवेंद्र कोळी, जाजीब शेख, दिपिका ठाकूर यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीतेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनात सुफयान शेख, करण पाटील, देव वेद, मयंक चांडक, पुनम ठाकूर, अक्षय हुंडीवाले, प्रणेश गांधी, फाल्गुनी पवार, कोनीका पाटील यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन किशोर सिंह सिसोदिया यांनी केले. सहप्रशिक्षक दिपिका ठाकुर यांनी आभार मानले.

या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, मनोज आडवाणी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button