
टीम आवाज मराठी, पुणे दि. 04 ऑक्टोबर 2024 -शहरातील कोंढवा परिसरात बोपदेव घाटात मित्रासोबत २१ वर्षीय तरुणी गेली होती. यावेळी या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी अज्ञात आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
संबंधित पीडित मुलगी ही मुळची सुरत येथील राहणारी असून तिचा मित्र जळगाव येथील राहणारा आहे .सदर दोघे पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत. गुरुवारी रात्री सदर दोघे दुचाकी वर बोपदेव घाट या ठिकाणी फिरायला गेले होते. त्यावेळी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान तीन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यांनी जबरदस्ती करत तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आहे .

या घाटात रात्रीच्यावेळी कोणच नसते, यामुळे कोणही मदतीला नव्हते. या घटनेमुळे घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या पीडित मुलीला तिच्या मित्राने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला.