क्रीडाजळगाव

जैन इरिगेशनच्या चौघं कॅरम पटूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने गौरव

जळगाव, दि.१८ प्रतिनिधी – जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय कॅरम पटू संदीप दिवे, अभिजित त्रिपणकर, योगेश धोंगडे तसेच आंतरराष्ट्रीय महिला कॅरमपटू नीलम घोडके यांचा श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुणे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा शानदार पुरस्कार सोहळा पार पडला.

(YOGESH DHONGADE CARAM PUNE) शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्विकारताना कॅरमपटू योगेश धोंगडे याप्रसंगी व्यासपीठावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवर.

याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव, आयुक्त यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

(CARAM PUNE AWARD F) – शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारार्थी कॅरमपटू संदीप दिवे, अभिजित त्रिपणकर, नीलम घोडगे

जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. ह्या कंपनीचा आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू योगेश धोंगडे यास सन २०२३–२४ करिता खेळाडू म्हणून श्री शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानीत केले. योगेश धोंगडे याची गेल्या ५ वर्षातील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरिल उल्लेखनीय कामगिरी आधारे महाराष्ट्र राज्य सरकारने त्या शिवछत्रपती पुरस्कारांने सन्मानित केले.

ह्याच बरोबर सन २०२२–२३ ह्या वर्षातील सर्व श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडूंना ही पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यात जैन इरिगेशनचो आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू संदीप दिवे, अभिजित त्रिपणकर यांचासह जैन इरिगेशनची आंतरराष्ट्रीय महिला कॅरमपटू नीलम घोडके हिलासुद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चौघं कॅरम पटूंच्या ह्या दैदिप्यमान कामगिरी बद्दल त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, संचालक अतुल जैन, प्रशासकीय क्रीडा अधिकारी अरविंद देशपांडे, क्रीडा समन्वयक रविंद्र धर्माधिकारी, सुयश बुरकुल, कॅरम व्यवस्थापक सय्यद मोहसिन व इतर सर्व सहकाऱ्यांनी कौतूक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button