जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे युवा श्रम संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास शिबीर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथे युवा संस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

टीम आवाज मराठी जळगाव दि.5-5-24 धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील महामंडलेश्वर स्वामी लोकेशानंद महाराज सेवाश्रम या ठिकाणी पाच दिवशीय निवासी युवा संस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

निवासी युवा श्रम संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी ज्येष्ठ गांधीयन अउपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला सुतीहार अर्पण करण्यात आले. स्वागत गीताने उद्घाटन झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या शिबीराच्या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि क्षमता विकासासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत असते. विद्यार्थ्यांमध्ये मध्ये नैतीक मुल्यांची रुजवणूक करने, महात्मा गांधीजींच्या विचारांचे संस्कार युवा पिढी होऊन, गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर राष्ट्राची निर्मिती योगदान प्रत्येक युवकाने द्यावे, हाच या मागचा उद्देश असतो. या प्रसंगी सरपंच डॉ.विजय पाटील यांनी विद्यार्थींशी संवाद साधला व शिबीरासाठी शुभेच्छा दिल्यात तसेच ज्येष्ट गांधीयन अब्दुल भाई यांनी श्रम संस्काराचे महत्त्व पटवून दिले. तसेच प्रथम सत्राचे प्रमुख वक्ते गिरीष कुळकर्णी यांनी युवकांची जबाबदारी काय शिबीरातून काय शिकाल व्यक्तीमत्त्व कसे घडवावे या विषयी सोदाहरण मार्गदर्शन केले. यावेळी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे स्वयंसेवक चंद्रकांत चौधरी, मयूर गिरासे, मंदिर सेवेकरी किसन अंबोरे आणि शिबिरार्थी उपस्थित होते. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रशांत सुर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम अस्वार यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button