महिलांच्या मतदानासाठी “पर्दानशीन” बूथ मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्या –
मुस्लिम महिला व पुरुषांची एक मुखी मागणी
टीम आवाज मराठी जळगाव दिनांक 30-4-24-मतदान जनजागृती उपक्रम अंतर्गत मुस्लिम समाजाच्या वतीने जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्या नेतृत्वात जळगाव शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रमुख पुरुष व महिला सदस्यांनी जळगाव जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक पिनोटे यांची भेट घेऊन त्यांना
परदानशिन बूथ जास्तीत जास्त संख्येने उपलब्ध करून द्या अशी एक मुखी मागणी करण्यात आली.
परदानशीन बूथ ची आवश्यकता का?
मतदानाची टक्केवारी कमी होण्याची विविध कारणे असली तरी त्यात प्रामुख्याने एक कारण असेही होते की मुस्लिम बहुल भागातील मतदान केंद्रावर बुरखा घातलेल्या महिला मतदानासाठी आल्यावर त्या ठिकाणी उमेदवाराचे बूथ एजंट एकमेकांशी भिडतात, बोगस मतदानाचा आरोप करतात, एवढेच नव्हे तर एजंटा कडून बुरखा काढण्याची मागणी यावरून वाद सुरू होते त्यामुळे महिला मतदानांवर परिणाम होत असतो व त्याचा परिणाम मतदानाचा वेग मंद होतो या गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी निवडणूक आयोगाने परदानाशिन बूथ ही संकल्पना तयार केली असून त्याची अंमलबजावणी विविध लोकसभा क्षेत्रात करण्यात यावी तसेच त्या बुथवर महिला मतदान कर्मचारी तैनात करण्यात यावे जेणेकरून लोकसभा रावेर व जळगाव या दोन्ही क्षेत्रात मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणावर आपले मतदानाचे हक्क बजावतील अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या बुरखाधारी महिलांची खास होती उपस्थिती
एडवोकेट नसरूनफातिमा, आलेमा नाझिया अहमद, शाहीन फारूक ,नाझेरा हसन, कमरुनिसा इकबाल, नसीम सय्यद फारुख, जरीन अब्दुल रउफ,शकीला जावेद, हाजरा फारुख शेख, अफसाना तय्यब, आदींनी प्रशासनाकडे आपली मागणी साठी साकडे घातले.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आश्वासन
रावेर लोकसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी अशोक पिनोटे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून आवश्यक ते पडदानशीन बुथ ची व्यवस्था करण्यात येईल व आयडी प्रूफ साठी सुद्धा महिला कर्मचारी नेमण्यात येतील असे आश्वासन दिले.
सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पुरुष प्रतिनिधींची उपस्थिती
मनियार बिरादरी चे अध्यक्ष फारुख शेख, कुलजमातीचे अध्यक्ष सय्यद चांद, हुप्फाझ फाउंडेशनचे हाफिज रहीम पटेल, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक शरद पवार गटाचे अध्यक्ष मजहर पठाण, उत्तर महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेचे एमआयएमचे अध्यक्ष सय्यद सनेर, ए यु सिकलगार फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, सामाजिक कार्यकर्ता तथा शहा बीरादरीचे अनीस शहा, इमदाद फाउंडेशनचे मतीन पटेल , मिजान फाउंडेशनचे तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कासिम उमर, उस्मानिया चे रईस शेख, शिकलगार बीरादरीचे मुजाहिद खान, मरकज फाउंडेशनचे अब्दुल रउफ रहीम, खरादि संघटनेचे मोहसीन युसुफ आदींची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन
१)निवडणूक निर्णय अधिकारी अशोक पिनोटे यांना निवेदन देताना नाझिया एजाज अहमद व एडवोकेट नसरून फातिमा सोबत फारुक शेख व इतर दिसत आहे
२)निवेदन दिल्यावर संयुक्तपणे आपले विचार मांडताना पुरुष व महिला शिष्ट मंडळ पदाधिकारी