Blog

कानमुनीजी म.सा. पंच तत्त्वात विलीन

आराध्य गुरुदेव कानमुनीजी म.सा. यांची उद्या गुणानुवाद सभा

कानमुनीजी म.सा. यांचे देवलोक गमन

टीम आवाज मराठी जळगाव-संयम सुमेरू, तपस्वीराज, पंडीतरत्न सर्वाधिक दीक्षा पर्यायी, परम आराध्य,गुरुदेव कानमुनीजी म.सा. यांचा १ एप्रिल २०२४ ला ९१ वर्षे पूर्ण होऊन ९२ व्या वर्षात पदार्पण होणे आणि याच दिवशी दुपारी सव्वा बारा वाजता संथारा शिजून देवलोक गमन होणे हा दैवी योगा योग म्हणायला हवा. त्यांचे दीक्षा वर्षाचे हे ७९ वे वर्ष होते. त्यांच्या पार्थिवावर जैन संथारा विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
श्री वर्धमान स्थानकवासी श्रावक संघ व श्री सकल संघाचे संघपती आदरणीय दलीचंदजी जैन, श्री संघाचे आधारस्तंभ मा. इश्वरबाबुजी ललवाणी,
धर्मदास गण परिषद चे श्री सुमितजी चोपडा,इंदौर यांनी विनयांजली अर्पण केली. या वेळी जळगाव येथील पाच व्यक्ती मिळून धार्मिक व पारमार्थिक, वैय्यावच् सेवा कार्यासाठी ११ लाख रुपयांची पुण्यस्मृती निमित्त पुण्यराशी घोषित केली गेली.
११ वर्षांपासून जळगावला स्थिरवास
मध्यप्रदेशातील धार जिल्हयातील राजगढ़ येथे १ एप्रिल १९३३ मध्ये जन्मलेले कानमुनी यांचे घरात धार्मिक संस्कार होते. १८ जानेवारी १९४५ ला मध्यप्रदेशातील खाचरौद येथे पिता, १ भाऊ, व १ बहीण अशी कुटुंबातील ४ जणांनी दीक्षा घेतली. धर्मदास संप्रदाय चे वरीष्ठ संत म्हणून त्यांची ख्याती होती. २०१३ ला चातुर्मास धार्मिक कार्यासाठी त्यांचे जळगाव येथे आगमन झाले होते. त्यांना मानणारा सर्वात मोठा भाविक वर्ग होता. त्यांच्या दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येकाला धर्मध्यान करावे असा आग्रह करीत असत. ते शिर्षासन करून प्रतिक्रमण करीत असत. प्रकृती अस्वास्थामुळे गत ७ वर्षांपासून ते आकाशवाणी चौकातील श्री सतिष ललवाणी यांच्या बंगल्यात ते स्थिर झाले होते.
आकाशवाणी चौक, स्वातंत्र्यचौक, पांडेचौक मार्गे नेरी नाका स्मशानभूमित त्यांचा पार्थिव आणला गेला व अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी दलूभाऊ जैन, ईश्वरबाबूजी ललवाणी, कस्तूरचंद बाफना, अशोक जैन, प्रदीप रायसोनी, सुशिल बाफना, मनिषदादा जैन, स्वरूप लुंकड, सतीश ललवाणी,ललीत लोडाया, राजेश जैन, जितेंद्र चोरडीया, अमर जैन, अजय राखेचा,पारस राका,आशिष भंडारी, तेजस कावडीचा, यांच्यासह समाज बांधव व समाज भगिनिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जळगाव जिल्हा, धुळे, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, खंडवा या जिल्हयातील भावीक ही त्यांच्या अंतिम यात्रेत सहभागी झाले होते.

आराध्य गुरुदेव कानमुनीजी म.सा. यांची उद्या गुणानुवाद सभा

जळगाव येथील आर सी बाफना स्वाध्याय भवन येथे परम आराध्य गुरुदेव कानमुनीजी म.सा. यांची२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी पावणे नऊ वाजता गुणानुवाद सभा आयोजली आहे यासाठी श्रावक श्राविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री सकल संघाचे अध्यक्ष दलिचंद जैन यांनी केली आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button