आर्ट मार्ट या राष्ट्रीय कला प्रदर्शनात जळगावच्या कलावंतांची चित्रे
टीम आवाज मराठी जळगाव-दि. २० फेब्रुवारी २०२४ ला मध्यप्रदेशच्या मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या महोत्सवाचे आयोजन २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
जळगाव दि.२२ प्रतिनिधी – मध्यप्रदेश द्वारा सुवर्ण जयंती वर्षानिमित्त आयोजित खजूराहो नृत्य महोत्सव अंतर्गत उस्ताद अल्लाउद्दीन खा संगीत आणि कला अकादमीच्या आर्ट मार्ट या राष्ट्रीय कला प्रदर्शनात जळगाव जिल्ह्यातील विकास मल्हारा, शाम कुमावत, विजय जैन, आनंद पाटील, प्रदीप पवार, सुनिल ताडे, दत्तु शेळके आणि ओशीन मल्हारा यांच्या चित्रांचा समावेश झाला आहे.
मध्यप्रदेशच्या संस्कृती मंत्रालयातर्फे संगीत उस्ताद अलाउद्दीन खाँ आणि कल अकादमी मध्यप्रदेश संस्कृती परिषद, भोपाळ च्या माध्यमातून जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो येथे वैशिष्ट्यपूर्ण खजूराहो नृत्य समारंभाचे आयोजन केले जाते. यावर्षी ५० व्या खजूराहो नृत्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या खजूराहो नृत्य महोत्सवादरम्यान मंदिर परिसरातील भव्य प्रांगणात दि. २० फेब्रुवारी २०२४ ला मध्यप्रदेशच्या मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या महोत्सवाचे आयोजन २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. देशभरातील नृत्य, चित्र, शिल्प, लोककला क्षेत्रातील मान्यवरांसह सामान्य रसिकांना ही मेजवानीचा आस्वाद घेता येईल. कान्हदेशातील चित्रकारांचा समावेशाने चित्रकला विश्वातील रसीक व शुभचिंतकांनी जळगावच्या चित्रकारांचे अभिनंदन केले आहे.
विकास मल्हारा, विजय जैन, आनंद पाटील हे जैन इरिगेशनच्या कला विभागातील सहकारी आहेत