जळगाव

शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत २७ जून रोजी मुख्यमंत्री जळगाव दौऱ्यावर

मा.महापौर, मा.उपमहापौर सन्मा.सदस्य मनपा प्रशासनातील सर्व विभागप्रमुख यांची आढावा बैठक

टीम आवाज मराठी, जळगाव। २४ जून २०२३ । शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत कार्यक्रमाकरिता मा. मुख्यमंत्री महोदय यांचा दिनांक २७/०६/२०२३ रोजी जळगाव जिल्ह्याचा दौऱ्यावर येत असल्याने त्या कार्यक्रमा कामी आज दिनांक २३/०३/२०२३ रोजी दुपारी ३:०० वाजता मा. आमदार महोदय श्री राजू मामा भोळे यांनी त्यासंदर्भात मा.महापौर, मा.उपमहापौर महोदय, सन्मा.सदस्य मनपा प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख यांची आढावा बैठक घेऊन त्यांना यावेळी माननीय आमदार महोदयांनी मार्गदर्शन केले. यावेळी माननीय महापौर महोदया सौ जयश्रीताई महाजन, माननीय आयुक्त महोदया डॉक्टर विद्या गायकवाड, सहाय्यक संचालक श्री अशोक करवंदे,अतिरिक्त आयुक्त श्री चंद्रकांत वानखेडे, उपयुक्त श्री अभिजीत बाविस्कर, उपयुक्त श्री गणेश चाटे, शहर अभियंता श्री चंद्रकांत सोनगिरे, सहाय्यक आयुक्त श्री उदय पाटील, सहाय्यक आयुक्त श्री सुनील गोराणे व सर्व खाते प्रमुख यावेळी उपस्थित होते

 

शासन आपल्या दारी या कार्यक्रमा द्वारे मा. मुख्यमंत्री महोदय हे महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये भेट देत आहे. शासना मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व राबविल्या गेलेल्या योजना तसेच जे लोक या शासन योजनेपासून वंचित आहे त्यांना या कार्यक्रमातून योजनेची माहिती मिळेल म्हणून महापालिकेच्या प्रत्येक प्रभागातील सन्माननीय सदस्यांनी लाभार्थी पर्यंत माहिती पोहोचवणे व त्यांना
, शासनाच्या योजना व या कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करणे कामी देण्यात आलेले टार्गेट पूर्ण करण्याबाबत सन्माननीय सदस्यांना संबोधित करण्यात आले

तसेच सदर कार्यक्रमाकरिता येणाऱ्या लाभार्थींना पिण्याच्या पाण्याची,फुड पॅकेटची व्यवस्था करणे बाबत, पार्किंग चे नियोजन करणे संदर्भात मनपा प्रशासनास यावेळी सूचित करून सूचना देण्यात आल्या.

 

त्यानुसार “शासन आपल्या दारी ” या अभियानांतर्गत होणाऱ्या कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करून तो यशस्वीरित्या पूर्ण करणे कामी मा. आयुक्त महोदयांनी उद्या दिनांक २४/०६/२०२३ रोजी सर्व खाते प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button