सत्रासेन आश्रमशाळेत शिक्षक दिवस साजरा
जिवनातील शिक्षकांचे महत्व यावर विद्यार्थ्यांना दिली माहिती
आत्माराम पाटील | आवाज मराठी टिम चोपडा | दिनांक ५ सप्टेंबर २०२३
चोपडा तालुक्यातीलयेथे आज शिक्षक दिवस निमित्ताने संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर रायसिंग भादले यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पुजन करण्यात आली.
माध्यमिक मुख्याध्यापिका वंदना सरदार पावरा, पदवीधर शिक्षिका दिपमाला भादले, प्राथमिक मुख्या. जगदिश महाजन, सुत्रसंचलन योगेश पाटील व झुलाल कंरकाळ यांनी केले. तसेच जगदीश महाजन, नरेंद्र देसले, यांनी राष्ट्र उभारणीसाठी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् व शिक्षक यांचे योगदान कसे महत्वाचे आहे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पटवून दिले.
संस्थेचे अध्यक्ष रविंद्र भादले यांनी सर्व शिक्षक बंधु भगिनींना शिक्षक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.त्यावेळी भालचंद्र पवार, गजानन पाटील, मनोज पाटील, नरेंद्र देसले, योगेश पाटील, माध्यमिक ज्येष्ठ शिक्षक संजय शिरसाळे, महेशकुमार शिंदे, कैलास महाजन,अधिक भादले, प्राथमिक शिक्षक विकास पाटील, अजय पावरा, सरोजिनी चौधरी, सुशीलकुमार चव्हाण, मनिषा भादले, योगेश पाटील,उदय वानखेडे, विकास कोळी, अनिल राणे, मनोज साळुंखे, पवन पावरा, प्रमिला पावरा, कल्पना पाटील, अधिक्षिका शितल पाटील, लिपिक दिलिप बाविस्कर, अधिक्षक मनोज महाजन, नरेंद्र महाजन, रमेश पावरा आदी उपस्थित होते.
सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधु भगिनींनी सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. तसेच भालचंद्र पवार यांनी आभार प्रदर्शन केले. आजच्या दिवशी विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला , शिक्षक दिनाच्या निमित्ताने महत्व पटवून दिले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.